उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे वैभववाडी तालुका प्रमुख मंगेश लोके यांची तहसीलदार यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी
वैभववाडी (प्रतिनिधी): नगरपंचायत वाभवे- वैभववाडी हद्दीतील महसूल विभागाच्या अखत्यारीत असलेल्या वैभववाडी फोंडा रस्त्यालगत शासकीय बंगल्याजवळ व शासकीय गोडाऊन नजीक सर्व्हे नंबर-३६ -अ१ या सरकारी जागेमध्ये अनधिकृत बांधकाम होत आहे या बांधकामाची कोणत्याही प्रकारची परवानगी न घेता दडपशाही मार्गाने हे बांधकाम केले जात आहे. या बांधकामाबाबत जिल्हाधिकारी यांची कुठल्याही प्रकारची परवानगी घेतली नसताना वैभववाडी फोंडा या राज्यमार्गालगत पक्के बांधकाम केले जात आहे तरी सदर बांधकाम हे माझ्या पूर्ण माहितीनुसार अनधिकृत सुरू आहे तरी आपण महसूल प्रशासनाच्या प्रमुख म्हणून व तालुक्याचे प्रमुख म्हणून यामध्ये त्वरित लक्ष घालून सदरचे चालू असलेले अनधिकृत बांधकाम थांबवावे व त्या बांधकामाची सखोल चौकशी करून संबंधित व्यक्ती किंवा अन्य कुठल्याही संस्थेचा यामध्ये सहभाग असेल तर त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात यावी अन्यथा आम्हाला लोकशाहीच्या अन्य मार्गाने आंदोलन करावे लागेल असे निवेदन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे वैभववाडी गटाचे तालुकाप्रमुख मंगेश लोके यांनी तहसीलदार वैभववाडी यांना दिले आहे.












