सिल्वर ओक वर अबीद नाईक यांनी घेतली राष्ट्रवादी पक्षाध्यक्ष शरद पवार यांची भेट

कणकवली (प्रतिनिधी) : गेल्या काही दिवसांमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेस मध्ये घडलेल्या अनेक घडामोडींच्या पार्श्वभूमीवर पक्षाचे अध्यक्ष माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांची मुंबई येथे सिंधुदुर्गातील राष्ट्रवादी नेते माजी नगरसेवक अबिद नाईक यांनी सिल्वर ओक या निवास्थानी भेट घेतली. शरद पवार यांनी पक्ष अध्यक्ष पदाचा राजीनामा देण्याचा निर्णय मागे घेतल्यामुळे त्यांचे पुष्पगुच्छ देऊन आभार मानले. भेटीवेळी अबिद नाईक यांच्या सोबत त्यांच्या बहिण अमिता खान, अबिद नाईक यांची मुलगी रिजा नाईक, भाचा नबील खान, भाची जारा खान उपस्थित होते.

error: Content is protected !!