द्वेषावर प्रेमाने विजय मिळवला…’ विजयानंतर राहुल गांधी यांची प्रतिक्रिया

(ब्युरो न्युज) : कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने एकहाती सत्ता मिळवल्याचं जवळपास स्पष्ट झालंय. कर्नाटक विधानसभेच्या 224 जागांपैकी काँग्रेसने सर्वाधिक 136 जागांवर आघाडी घेतलीय. तर भाजपचा सुपडा साफ झाला आहे. भाजपाला 64 जागांवर समाधान मानावं लागत असल्याचं चित्र आहे. दक्षिण भारतात कर्नाटक हे एकमेव राज्य भाजपाच्या हातात होतं, तेही आता निघून गंलय. या विजयानंतर काँग्रेसमध्ये उत्साहाचं वातावण आहे. भाजपा कायक्रत्यांनी राज्यात ठिकठिकाणी फटाक्यांची आतषबाजी करत विजयाचा जल्लोष साजरा केला.

कर्नाटकमधल्या विजयानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पहिली प्रतिक्रिया दिली. आहे. त्यांनी कर्नाटकमधल्या जनतेचे आणि कर्नाटकमधल्या नेत्यांचे, कार्यकर्त्यांचे आभार मानले आहेत, त्यावेळी त्यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. कर्नाटकच्या निवडणुकीत एकीकडे भांडवलदारांची ताकद होती, तर दुसरीकडे गरीब जनतेची शक्ती होती. शक्तीने ताकदीचा पराभव केला. हेच चित्र देशात दिसेल असा विश्वास राहुल गांधी यांनी व्यक्त केला. आम्ही गरीबांच्या प्रश्नावर निवडणूक लढवली. आम्ही प्रेमाने ही लढाई जिंकलो. कर्नाटकात द्वेशाचा बाजार बंद झाला आहे, आणि प्रेमाची दुकानं सुरु झाली आहे. हा विजय कर्नाटकच्या जनतेचा विजय आहे असं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे. तर आम्ही कर्नाटकच्या निडणुकीत जनतेला पाच आश्वासनं दिली होती, ती पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीत पूर्ण करु असं वचनही त्यांनी दिलंय.

error: Content is protected !!