शेर्ले-आरोसबागवाडी येथील निवृत्त शिक्षक घनश्याम बांदेकर यांचे निधन

बांदा (प्रतिनिधी) : शेर्ले-आरोसबागवाडी येथील रहिवासी निवृत्त शिक्षक घनश्याम महादेव बांदेकर (तारी) वय ८५ यांचे राहत्या घरी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांच्यावर बांदा – रामनगर येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी ग्रामस्थ, नातेवाईक तसेच राजकीय व सामाजिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. त्यांच्या पश्चात दोन मुलगे, दोन सुना, दोन विवाहित मुली, नातवंडे, चुलत भाऊ व बहीण, पुतण्या व पुतणे आहेत.

बांदा विकास सोसायटीचे ते माजी चेअरमन व विद्यमान संचालक होते. सहकार क्षेत्रात गेली अनेक वर्षे ते कार्यरत होते.

error: Content is protected !!