उत्कृष्ट सेवेसाठी डॉ. प्रणील साळुंखे यांचा SBI Life Insurance Company Ltd. कडून सन्मान….!

आचरा (प्रतिनिधी) : ग्राहकांना उत्कृष्ट व विश्वासार्ह सेवा प्रदान केल्याबद्दल डॉ. प्रणील साळुंखे बागायत मालवण यांचा “sbilife.co.in” तर्फे विशेष सत्कार करण्यात आला. या प्रसंगी SBI Life चे सल्लागार चंद्रकांत सावंत तसेच सक्सेस कॉम्प्युटर बागायतचे संचालक समीर पेडणेकर उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी डॉ. साळुंखे यांच्या ग्राहकाभिमुख कार्याची व समर्पित सेवेची प्रशंसा करत त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. या सन्मानामुळे डॉ. प्रणील साळुंखे यांच्या कार्याला नवी प्रेरणा मिळाली असून, भविष्यातही ग्राहकांना दर्जेदार व विश्वासार्ह सेवा देण्याचा त्यांनी संकल्प व्यक्त केला.

error: Content is protected !!