सिंधुदुर्गातील शैक्षणिक संस्थांसाठी कनेडी गट शिक्षण प्रसारक मंडळ आदर्श ठरावे ; सतीश सावंत

कनेडी गट शिक्षण प्रसारक मंडळ मुंबईचा 72 वा वर्धापनदिन व विद्यार्थी गुणगौरव सोहळा संपन्न

कणकवली (प्रतिनिधी) : कनेडी गट शिक्षण प्रसारक मंडळ मुंबई या संस्थेचा 72 वा वर्धापनदीन सोहळा संपन्न झाला. यनिमित्त प्रशाळेतील विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा व प्रतिथयश मान्यवरांचा सन्मान यावेळी करण्यात आला. या वर्धापनदिनी महाराष्ट्र राज्य साहित्य आणि सांस्कृतिक मंडळाचे उपाध्यक्ष प्रा.डॉ. प्रदीप ढवळ यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती. प्रथमतः मान्यवरांच्या उपस्थिती मध्ये दीप प्रज्वलन करण्यात आले. माध्यमिक बालमंदिरच्या छोट्या विद्यार्थ्यांनकडून वेलकम गीत सादर करत उपस्थिती मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. या नंतर शाळेचे गौरव गीत मान्यवरांन समोर सादर केले. कनेडी गट शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सतीश सावंत यांनी प्रा. डॉ. प्रदीप ढवळ यांचा सन्मान केला. व्यासपीठावर उपस्थिती सर्व मान्यवरांचा सन्मान यावेळी करण्यात आला. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विविध क्षेत्रात यश प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला. शाळेचे माजी विद्यार्थी यांनी प्राप्त केलेल्या यशाबद्दल त्यांचाही सत्कार केण्यात आला. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना विविध शैक्षणिक क्षेत्रात काम करणाऱ्या शिक्षकांचा सन्मान यावेळी उपस्थिती मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाला.

प्रशालेचे सरचिटणीस शिवाजी सावंत यांनी शाळेचा लेखाजोगा सादर केला. उल्लेखनीय कार्य व विविध उपक्रम या संस्थेच्या माध्यमातून राबविले जातात. गेली सलग 17 वर्षे 100% निकाल या संस्थेने दिला आहे. मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा यामध्ये सलग तीन वर्षे प्रथम मानांकन या संस्थेने पटकविले आहे.

यावेळी कनेडी शिक्षण गट प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सतीश सावंत यांनी आपले मनोगत व्यक्त केले, 72 व्या वर्धापनदिनी शुभेच्छा देत विद्यार्थ्यांनी प्राप्त केलेल्या यशाचे कौतुक केले. गेली 17 वर्षे सातत्य 100% निकाल ही संस्था देत आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील इतर शैक्षणिक संस्थांची, कनेडी गट शिक्षण प्रसारक मंडळ मार्गदर्शक व्हावी असा आदर्श आपल्या संस्थेने येत्या वर्षात करावा. 72 वर्षापूर्वी लावलेल्या छोट्या रोपट्याचे आज वटवृषात रूपांतर झाले आहे. या संस्थेच्या माध्यमातून नवनवीन उपक्रम, विद्यार्थ्यांचे कौशल्य वाढावे यासाठी कायमच कनेडी गट शिक्षण प्रसारक मंडळ प्रयन्तशील असते.ग्रामीण भागात कॉम्प्युटर सायन्य ची सुविधा नाही येत्या चालू वर्षात आपल्या संस्थेच्या माध्यमातून ती देखील पूर्ण करण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला. आपल्या प्रशाळेतील सामान्य घरातील मुलगा आज डॉक्टर होतो ही संस्थेसाठी अभिमानाची गोष्ट आहे.

महाराष्ट्र राज्य साहित्य आणि सांस्कृतिक मंडळाचे उपाध्यक्ष प्रा.डॉ. प्रदीप ढवळ यांनी कनेडी गट शिक्षण प्रसारक मंडळाच्या 72 व्या वर्धापनदिनी शुभेच्छा दिल्या व विशेष प्राविण्य मिळविलेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. एखादी शैक्षणिक संस्था 72 वर्षे कार्यरत ठेवणे हे मोलाचे कार्य हे आज या व्यासपीठावर बसलेल्या या सर्व महनीय व्यक्तीमुळे साध्य झालेले आहे. असे प्रतिपादन यावेळी प्रा. डॉ. ढवळ यांनी केले.

यावेळी प्रा. डॉ. प्रदीप ढवळ यांची प्रमुख उपस्थिती, कनेडी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सतीश सावंत, संचालक संदेश सावंत, पी. डी. सावंत, सरपंच संजय सावंत, संस्था सरचिटणीस शिवाजी सावंत, खजिनदार प्रकाश सावंत, चिटणीस नागेश सावंत, रत्नाकर सावंत, व्ही.बी.सावंत, सांजय सावंत, सागर सावंत, सुधीर सावंत,शालेय समिती चेअरमन आर. एच. सावंत, खजिनदार गणपत सावंत, सदस्य तुषार सावंत, संतोष सावंत, नितीन सावंत, चंद्रशेखर वाळके, अशोक कांबळे, रायमन घोन्यालवीस, गांधीनगर सरपंच मंगेश बोभाटे, नाटळ सरपंच सुनील घाडीगावकर, हरकुळ सरपंच आनंद ठाकूर, उपसरपंच प्रफुल्ल काणेकर, सांगवे ग्रा. स. कैलास सावंत, सामाजिक कार्यकर्ते विजय भोगटे, गांधीनगर उपसरपंच राजेंद्र सावंत, मा.पं.समिती सदस्य मंगेश सावंत, जयवंत सावंत, संजय सावंत, अमेय ठाकूर, ओमप्रकाश ताम्हाणेकर, प्रशालेचे मुख्याध्यापक सुमन दळवी सर, सह शिक्षक बुराण सर या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रसाद मसुरकर सर यांनी केले. यावेळी इतर शिक्षक, विद्यार्थी, पालक आदी उपस्थित होते.

error: Content is protected !!