कणकवली (प्रतिनिधी) : सामाजिक बांधिलकी जपत विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला आणि त्यांच्या दैनंदिन गरजांना हातभार लावण्याच्या उद्देशाने वरवडे ग्रामस्थ कला, क्रीडा मंडळाच्या वतीने वरवडे गावातील जिल्हा परिषदच्या सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांना मोफत छत्रींचे वाटप करण्यात आले. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना शाळेत ये-जा करताना कोणताही त्रास होऊ नये, तसेच त्यांच्या शिक्षणात अडथळा निर्माण होऊ नये, या सामाजिक जाणिवेतून हा उपक्रम राबविण्यात आला.
यावेळी विद्यार्थ्यांना छत्रींचे वितरण करताना मंडळाच्या पदाधिकारी व सदस्यांनी शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित करत विद्यार्थ्यांनी नियमित शाळेत उपस्थित राहून मन लावून शिक्षण घ्यावे, असे आवाहन केले. यावेळी मंडळाचे अध्यक्ष संतोष उर्फ पप्पू पुजारे, पदाधिकारी निलेश सादये, विनायक घाडीगांवकर, अनिल घाडीगांवकर, निलेश सावंत, सुमंगल सावंत, चेतन सावंत, अभिनंदन सादये, सीझर फना॔॑डीस, मिलिंद आरोसकर, रुपेश वायंगणकर, संतोष परब, मनीष वरवडेकर, विवेक राणे, स्वप्निल परब, सागर घाडीगांवकर, अनिकेत घाडीगांवकर, आकाश घाडीगांवकर, राजू परब, विठ्ठल घाडीगांवकर, मनोज घाडीगांवकर, आदित्य घाडीगांवकर, प्रशांत घाडीगांवकर, करण घाडीगांवकर, कुणाल घाडीगांवकर आदी उपस्थित होते. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांसह पालकांनीही समाधान व्यक्त करत ग्रामस्थ कला क्रीडा मंडळाच्या सामाजिक कार्याचे कौतुक केले. वरवडे ग्रामस्थ कला क्रीडा मंडळ गेल्या अनेक वर्षांपासून विविध सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा व सांस्कृतिक उपक्रम राबवत असून समाजोपयोगी कार्याची परंपरा सातत्याने जपत आहे. विद्यार्थ्यांच्या हिताचा विचार करून राबविण्यात आलेल्या या छत्रीवाटप उपक्रमामुळे गावात समाधानाचे वातावरण निर्माण झाले असून, अशा उपक्रमांमुळे समाजात सेवाभाव आणि सामाजिक उत्तरदायित्वाची भावना अधिक दृढ होत असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.














