माजी जि प सदस्य प्रदीप नारकर यांना मातृशोक

विठ्ठलादेवी येथील सुप्रभा नारकर यांचे निधन

तळेरे (प्रतिनिधी) : शिवसेनेचे पोंभुर्ले जिल्हा परिषद मतदारसंघाचे माजी जिल्हा परिषद सदस्य तथा बृहन्मुंबई महानगरपालिका मान्यताप्राप्त कामगार संघटना म्युनिसिपल मजदूर युनियन मुंबई चे सहाय्यक सरचिटणीस प्रदीप नारकर यांच्या मातोश्री सुप्रभा गोविंद नारकर ( वय वर्षे 77 , मूळ रा. विठ्ठलादेवी फणसगाव , सध्या रा. दादर ) यांचे रविवार 12 जुलै रोजी सायंकाळी अल्पशा आजाराने वैद्यकीय उपचारादरम्यान निधन झाले. त्यांच्यावर मुंबईतील नायर हॉस्पिटलमध्ये वैद्यकीय उपचार सुरू होते. त्यांच्या पार्थिवावर 13 जुलै रोजी शिवाजी पार्क दादर येथील स्मशानभूमीत अंत्यविधी करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चत पती, मुलगा, चार विवाहित मुली, सून, जावई, नातवंडे असा परिवार आहे. सुप्रभा यांच्या निधनाबद्दल हळहळ व्यक्त होत आहे.

error: Content is protected !!