बांदा (प्रतिनिधी) : येथील व्ही.एन.नाबर मेमोरियल इंग्लिश मिडीयम स्कूल बांदा मधील तंत्रविषय एम.एस.ए.टि या विभागातर्फे शाळेत वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न झाला. शाळेच्या मुख्याध्यापिका मनाली देसाई यांच्या हस्ते सर्वप्रथम वृक्षारोपण करण्यात आले. यानंतर एम.एस.ए.टि विभागाचे समन्वयक राकेश परब, निदेशक भूषण सावंत, निदेशिका गायत्री देसाई, रिया देसाई, शिक्षकेतर कर्मचारी प्रकाश झाट्ये यांनी आपल्या हस्ते वृक्षारोपण केले. या विभागामध्ये नर्सरी व बागकाम या उपविभाग यामार्फत शाळेत दरवर्षी वृक्षारोपण करण्यात येत असते याहीवर्षी या विभागातील विद्यार्थ्यांनी सुद्धा स्वतः आपण झाडे आणून वृक्षारोपण केले. यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका मनाली देसाई, तसेच एम.एस.ए.टी विभागाचे निदेशक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
व्ही.एन.नाबर मेमोरियल इंग्लिश मिडीयम स्कूल बांदा मधील एम.एस.ए.टि विभागातर्फे वृक्षारोपण











