परी नेवरेकर व वैदेही कडू यांनी उत्कृष्ट सांघिक कामगिरी करत पटकावला प्रथम क्रमांक
वैभववाडी (प्रतिनिधी): ओरस सिंधुदुर्गनगरी येथे आयोजित करण्यात आलेल्या वार्षिक एनसीसी (NCC) शिबिरातील प्रश्नमंजुषा स्पर्धेत वैभववाडी तालुका शिक्षण संस्थेच्या अर्जुन रावराणे विद्यालय, जयेंद्र दत्ताराम रावराणे सेमी इंग्लिश स्कूल वैभववाडीच्या कॅडेट्सनी प्रथम क्रमांक पटकावत विद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला. या स्पर्धेत विद्यालयाच्या SGT परी नेवरेकर व LCPL वैदेही कडू यांनी उत्कृष्ट सांघिक कामगिरी करत प्रथम क्रमांक मिळवून विद्यालयाचा गौरव वाढविला. त्यांच्या अभ्यासू वृत्ती, आत्मविश्वास आणि एनसीसी विषयावरील सखोल ज्ञानामुळे त्यांनी हे यश संपादन केले. या यशामागे एनसीसी अधिकारी (ANO) संदेश (एस. टी.) तुळसणकर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. त्यांच्या सातत्यपूर्ण प्रशिक्षणामुळे आणि प्रेरणेमुळे कॅडेट्सनी हे यश मिळविले. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल संस्थेचे कार्याध्यक्ष जयेंद्र रावराणे,विद्यालयाचे मुख्याध्यापक बी.एस.नादकर, सर्व शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी, पालक यांनी अभिनंदन केले. या यशामुळे विद्यालयाच्या एनसीसी विभागाच्या गुणवत्तापूर्ण प्रशिक्षणाची आणि विद्यार्थ्यांच्या मेहनतीची पुन्हा एकदा प्रचिती आली. सर्व स्तरातून त्यांच्या भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा व्यक्त करण्यात येत आहेत.














