भाजपा युवा नेते विशालभाई परब यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या दिव्यांग बांधवांसाठी ‘देवदर्शन आनंदयात्रा’; सहलीचा भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकरजी सावंत यांनी केला शुभारंभ

विशाल परब यांच्या वाढदिवसानिमित्त ४० दिव्यांग बांधवांना अक्कलकोट, तुळजापूर, पंढरपूर, नृसिंहवाडी, महालक्ष्मी व आदमापूरचे दर्शन

कसाल (प्रतिनिधी) : भाजपा युवा नेते विशाल परब यांच्या वाढदिवसानिमित्त दिव्यांग बांधव-भगिनींसाठी आयोजित करण्यात आलेल्या ‘देवदर्शन आनंदयात्रे’चा शुभारंभ कसाल येथे (६ ऑक्टोबर) सायंकाळी ६ वाजता भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकरजी सावंत यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी भाजपा चे राज्य परिषद सदस्य राजु राऊळ, जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्ना ऊर्फ बाळु देसाई, उपनगराध्यक्ष सुहास गवंडळकर उपस्थित होते. या विशेष उपक्रमांतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सुमारे ४० दिव्यांग बांधवांना दोन रात्री व तीन दिवसांची विशेष देवदर्शन यात्रा घडविण्यात येणार आहे.

या यात्रेदरम्यान अक्कलकोट, पंढरपूर, तुळजापूर, नृसिंहवाडी, कोल्हापूर येथील श्री महालक्ष्मी मंदिर तसेच आदमापूर येथील संत बाळूमामा मंदिराचे दर्शन दिव्यांग बांधवांना घडविण्यात येणार आहे.

दिव्यांग बांधवांना धार्मिक स्थळांचे दर्शन घेण्याची संधी मिळावी, त्यांच्या जीवनात आनंदाचे क्षण निर्माण व्हावेत आणि सेवा, माणुसकी व बांधिलकीचा संदेश समाजापर्यंत पोहोचावा, या उद्देशाने या आनंदयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे.

‘माणुसकीच्या नात्याने… देवदर्शनाच्या वाटेने!’ या भावनेतून आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमामुळे दिव्यांग बांधवांसाठी हा प्रवास निश्चितच अविस्मरणीय ठरणार आहे.

या सहलीमध्ये भाजपा दिव्यांग आघाडीचे जिल्हा संयोजक अनिल शिंगाडे, सह संयोजक शामसुंदर लोट, कोषाध्यक्ष सुनील तांबे, सह संयोजक प्रकाश वाघ, देवगड प्रभारी दिक्षा तेली, सावंतवाडी प्रभारी सविता गावडे, सावंतवाडी अध्यक्ष बाबुराव गावडे, मालवण प्रभारी रंजना इंदुलकर, वेंगुर्ले प्रभारी सुनील कांबळी, क्रीडा प्रभारी प्रशांत कदम, शासकीय योजना प्रभारी विजय कदम, कणकवली प्रभारी प्रकाश सावंत, कणकवली तालुका अध्यक्ष राजेंद्र मेस्त्री इत्यादी पदाधिकारयांसह ४० दिव्यांग महीला व पुरुष सहभागी झाले आहेत.

error: Content is protected !!