कणकवली (प्रतिनिधी) : महाराष्ट्र नगरोत्थान महा अभियान अंतर्गत येणाऱ्या विकास निधीतून भारतीय जनता पार्टीचे आमदार प्रमोद जठार यांच्या शिफारशीनुसार कणकवली शहरातील वार्ड क्रमांक 10 मध्ये जनतेच्या मागणीनुसार चिंतामणी अपार्टमेंट येथे 15 लाख रुपयाचे बंदिस्त गटार व मसुरकर किन्हई रोड येथे 5 लाख रुपये हायमास्ट मंजुरीचे पत्र जिल्हा नियोजन कडून कणकवली नगरपंचायत ला प्राप्त झाले आहे. सदर कामासाठी माजी नगरसेवक शिशिर परुळेकर यांनी मागणी केली होती.
आमदार प्रमोद जठार यांच्या शिफारशीनुसार कणकवली शहरात वीस लाखाची विकास कामे मंजूर












