शिक्षक संतोष तांबे यांना ‘महाराष्ट्र गुणगौरव पुरस्कार-२०२६’ प्रदान

कणकवली (प्रतिनिधी) : समाजसेवा, प्रामाणिक कार्यपद्धती, कर्तव्यनिष्ठा आणि समाज परिवर्तनासाठी उल्लेखनीय योगदानासाठी दिला जाणारा यावर्षीचा बी. दि. चेंज फाउंडेशन, शिर्डी जिल्हा अहिल्यानगरचा महाराष्ट्र गुणगौरव पुरस्कार -2026 कणकवली तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा माईण युनिट नं.1 (केंद्र-सावडाव) येथील सेवाभावी आणि विद्यार्थीप्रिय, प्रयोगशील शिक्षक संतोष लक्ष्मण तांबे यांना सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला आहे.

संतोष तांबे यांनी आपल्या 34 वर्षांच्या शैक्षणिक सेवाकालात विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी वैशिष्ट्यपूर्ण शालेय आणि सहशालेय उपक्रम राबविले आहेत. अनेक स्पर्धा परिक्षांसाठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले आहे. ते एक उत्तम लोककलावंत, उत्तम अध्यापक, तंत्रस्नेही शिक्षक, कुशल शिक्षक संघटक आणि सेवाभावी कार्यकर्ते आहेत. त्यांच्या समग्र कार्याची दखल घेऊन नुकताच त्यांना सावंतवाडी येथील नामदार दीपक केसरकर मित्रमंडळाच्या वतीने गुरुसेवा सन्मान पुरस्कारही जाहीर झाला आहे. तसेच यापूर्वी तांबे यांना जाहीर झालेल्या गूरूसेवा सन्मान पुरस्काराचे शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रात सर्वत्र कौतुक होत आहे.

error: Content is protected !!