गोठणेत मोटारसायकल कोसळली ओहोळात, तिघे जखमी

अमोल गोसावी यांचे प्रसंगावधन ; तिन्ही जखमींना नेले रुग्णालयात

कणकवली (प्रतिनिधी) : रामगड हुन कणकवली च्या दिशेने मोटारसायकलचालकाचे नियंत्रण सुटून मोटरसायकलचा अपघात होऊन मोटरसायकल प्रवाशांसह रस्त्यालगतच्या ओहोळात कोसळली. आचरा कणकवली मार्गावर गोठणे वड येथे पुलाजवळ बुधवार 7 ऑक्टोबर रोजी सकाळी सव्वा अकरा वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला. पल्सर मोटरसायकलवरून तीन प्रवासी कणकवलीच्या दिशेने जात होते. वळणावर मोटरस्यकल चालकाचे नियंत्रण सुटून मोटारसायकल ओहोळात कोसळली. तिन्ही प्रवासी मोटरसायकल सह पुलाखाली ओहोळात पडून जखमी झाले. याच दरम्यान मोटरसायकल च्या मागून कणकवली च्या दिशेने आपल्या कारमधून जाणाऱ्या कणकवली तालुक्यातील हरकुळ बुद्रुक गावचे रहिवासी अमोल गोसावी यांनी अपघातग्रस्तांना 108 ऍम्ब्युलन्स मधून कणकवली उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. तिन्ही जखमींवर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू करण्यात आले आहेत.

error: Content is protected !!