देवधर कालव्यातून उगवाई नदी व लोरे धरणात पाणी सोडल्यास दुष्काळाचा आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निकाली लागेल ! — फोंडाघाट ग्रामस्थ

प्रशासनाने तातडीने कार्यवाही केल्यास, लोकसहभाग व सहकार्याची ग्वाही !

फोंडाघाट (प्रतिनिधी) : देवधर पाटबंधारे प्रकल्पाचे कालव्याच्या संदर्भात, दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, विभागाला कित्येक महिन्यानंतर जाग आली. खात्याने उपअभियंता रुपेश प्रकाश चव्हाण आणि कनिष्ठ अभियंता राजेश शिवापुरकर यांना पाठवून, फोंडाघाट ग्रामपंचायत येथे कालव्याचे प्रश्न बाबत प्रकल्पग्रस्त आणि लगत शेतकरी यांच्याशी चर्चा केली व प्रश्न समजावून घेतले…

दरम्यान मंगळवार तारीख 13 ऑक्टोबर 26 रोजी दहा वाजता फोंडाघाट हद्दीपासून कालवा पोट कालवा त्याची आजच्या परिस्थितीप्रमाणे नोंदणी व पाहणी शेतकरी प्रकस प्रकल्पग्रस्तांच्या समोर माहिती देण्यात येणार आहे यावेळी संबंधितांनी हजर राहण्याचे सांगण्यात आले.

दुष्काळाच्या झळा कमी करण्यासाठी, आत्ताच वाहत्या पाण्यावर ४० वनराई बंधारे व २५ जलतारा शोष खड्डे, लोकसभागातून बांधण्याची सूचना करण्यात आली. सन २०१७ मध्ये चालू झालेला देवधर प्रकल्प तातडीने कार्यान्वित करावा. यासाठी ५० मीटर पर्यंत पाईप टाकून,तसेच धरणाच्या कालव्याचे पाणी लोरे धरणामधून विहिरीमध्ये सोडल्यास, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी मिटेल.महिला शेतकरी प्रमाणपत्राच्या मान्यता देणे. तसेच अंजनव्हाल, गडगेसकल बंधाऱ्यांना प्लेटी टाकणे, वकिलांना देय रकमेची निर्गत लावणे. इत्यादी प्रश्नावर सर्वंकष चर्चा झाली…

दुष्काळाचा सामना करण्यासाठी लोकसहभाग आणि सहकार्यातून परिस्थिती आटोक्यात येण्यास प्रशासन प्रयत्नशील राहील.अशी ग्वाही अधिकाऱ्यांनी दिली. यावेळी अधिकाऱ्यांसह सरपंच सौ संजना आग्रे ,उपसरपंच तन्वी मोदी,जी. प. सदस्य राजन चिके, प.स. सदस्य पवन भालेकर, सुनील लाड, सुदेश लाड आबू पटेल, दर्शना पेडणेकर,चंद्रहास लाड, जयप्रकाश पारकर, प्रमोद पारकर, अमित चव्हाण, प्रकाश लाड, अनिल लाड, महेश लाड, विलास पांचाळ, अंकुश कोदे, मनीषा चव्हाण आदी लगतचे शेतकरी व प्रकल्पग्रस्त उपस्थित होते.

error: Content is protected !!