व्हॉईस ऑफ मीडिया महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणीत पत्रकार परेश राऊत व समीर तुकाराम म्हाडेश्वर यांची वर्णी

*सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) :* पत्रकारांच्या हक्क, संरक्षण आणि सामाजिक बांधिलकीसाठी कार्यरत असलेल्या व्हॉईस ऑफ मीडिया या राष्ट्रीय पत्रकार संघटनेच्या महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणीत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पत्रकार परेश राऊत आणि समीर तुकाराम म्हाडेश्वर यांची निवड झाल्याने जिल्ह्यातील पत्रकार व सामाजिक क्षेत्रातून दोघांवरही अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.परेश राऊत आणि समीर तुकाराम म्हाडेश्वर हे दोघेही पत्रकारितेच्या माध्यमातून सर्वसामान्यांच्या प्रश्नांना सातत्याने वाचा फोडत असून सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक तसेच लोकहिताच्या विषयांवर सक्रियपणे कार्यरत आहेत. पत्रकारितेतील त्यांचे योगदान आणि संघटनात्मक कार्याची दखल घेत त्यांची महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणीत निवड करण्यात आली आहे.दोन्ही पत्रकारांनी राज्यभरातील पत्रकारांचे प्रश्न, त्यांच्या हक्कांचे संरक्षण, पत्रकार सुरक्षा, संघटन मजबूत करणे आणि पत्रकार कल्याणासाठी अधिक प्रभावीपणे कार्य करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.या निवडीबद्दल सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते, विविध संघटनांचे पदाधिकारी, मित्रपरिवार आणि मान्यवरांनी परेश राऊत व समीर तुकाराम म्हाडेश्वर यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत.

error: Content is protected !!