अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ महाराज म्हणजे दयेचा सागर – अभिनेत्री दीपा परब -चौधरी

श्री स्वामी समर्थ मठाची‌ उभारणी‌‌ करुन हनुमंत सावंत यांनी सामाजिक आणि धार्मिक बांधिलकी जोपासली

कणकवली((प्रतिनिधी): अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ महाराज म्हणजे दयेचा सागर आहेत, ते सतत आपल्याला दु:खातही एखादा आशेचा किरण, सुखाची झुळूक दाखवत राहतात. स्वामी असे करतात कारण आपला प्रिय भक्त आपल्यापासून दुरावू नये म्हणून. भक्तांनी अडचणीत असताना नामस्मरण करत राहावे अशा वेळी स्वामी सदैव आपल्या बरोबर राहून अडचणींच्या काळात आपला मार्ग सोपस्कर करत राहतात. म्हणूनच नामःस्मरण करत राहावे, नामाचा मार्ग कधीच सोडू नये, कारण आपले पूर्वसंचित भोगल्याशिवाय कधीच आपली साधना फळाला येत नाही.स्वामींचेच बोलावणे होते म्हणून आपण इथे आले.असे प्रतिपादन अभिनेत्री दीपा परब- चौधरी यांनी कळसुली येथे केले. कळसुली- हर्डी येथील श्री स्वामी समर्थ मठाला दीपा परब यांनी सोमवारी सदिच्छा भेट दिली आणि श्री.स्वामी समर्थांच्या मूर्तीचे दर्शन घेतले. यावेळी आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. यावेळी त्यांच्या सोबत प्रेम दया प्रतिष्ठान (मुंबई) आणि श्री स्वामी समर्थ मठ कळसुली चे अध्यक्ष हनुमंत सावंत, उपाध्यक्षा हर्षाली हनुमंत सावंत, प्रेमदया प्रतिष्ठान विश्वस्त स्वप्ना पालकर, कार्याध्यक्ष संदीप सबनीस, सचिव संदीप पालकर ,विश्वस्त संजय सावंत, माजी सरपंच साक्षी परब.सत्यवान परब आदी उपस्थित होते. पुढे बोलताना अभिनेत्री दीपा परब म्हणाल्या कि, हनुमंत सावंत यांनी कळसुली सारख्या ग्रामीण भागात श्री स्वामी समर्थ महाराजांचा मठ बांधून एक चांगले कार्य हाती घेतले आहे.श्री स्वामी समर्थ मठाची‌ उभारणी‌‌ करुन सामाजिक आणि धार्मिक बांधिलकी जोपासली आहे.स्वामी भक्तांना हि एक चांगली पर्वणी आहे. यावेळी प्रेयदया प्रतिष्ठान चे अध्यक्ष हनुमंत सावंत म्हणाले की,दीपा परब या कळसुली गावच्या सुकन्या आहेत.सुप्रसिद्ध अभिनेत्री म्हणून त्या परीचित आहेत “झी मराठी ” वाहिनीवरील” तु चाल पुढं “या मालिकेत प्रमुख भूमिकेत दिसत आहे.आपल्या अभिनयाबरोबरच कळसुली गावचे नाव उज्ज्वल केले आहे.असे गौरवोद्गार हनुमंत सावंत यांनी काढले. प्रेमदया प्रतिष्ठान मुंबई आणि श्री स्वामी समर्थ मठ कळसुली यांच्या वतीने उपाध्यक्षा हर्षाली हनुमंत सावंत आणि स्वप्ना पालकर यांनी अभिनेत्री दीपा परब – चौधरी यांचा शाल श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.यावेळी बहुसंख्येने ग्रामस्थ आणि स्वामी भक्त उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!