वेंगुर्ले तालुक्यातील खानोली हरीजनवाडी ते हरीचरणगिरी रस्त्याचे काम तातडीने चालु करा-भाजपाची मागणी

आचरा (प्रतिनिधी): वेंगुर्ले तालुक्यातील खानोली हरीजनवाडी ते हरिचरणगिरी रस्ता ग्रा.मा.१८४ कि.मी.०/०ते ३/८०० मध्ये डांबरीकरण मजबुतीकरण काम दिनांक ६ फेब्रुवारी २०२३ रोजी मंजूर होऊन ठेकेदाराला कार्यारंभ आदेश दिला असला तरी १७ मे उलटला तरी मटेरीयल टाकून अद्याप कामाची सुरुवात केली नसल्याने खानोली ग्रामस्थांनी भाजपा पदाधिकाऱ्यांसह उपअभियंता भगत यांची भेट घेऊन ठेकेदाराने आठ दिवसांत काम सुरु न केल्यास सार्वजनिक बांधकाम मंत्री व पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांचे कडे तक्रार करणार असल्याचे सांगीतले. फेब्रुवारी महिन्यात ठेकेदाराला कार्यारंभ आदेश देऊन सुद्धा आता पावसाळा जवळ आला असताना ठेकेदाराने रस्त्याचे काम सुरु न केल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजी पसरली आहे. यापूर्वी विकास कामांना निधी मिळत नव्हता, परंतु आता शिंदे – फडणवीस सरकारने त्या रस्त्याला निधी उपलब्ध करून देऊन सुद्धा ठेकेदाराच्या आडमुठ्या धोरणामुळे ग्रामस्थांना त्याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. खानोली सरपंच प्रणाली खानोलकर व उपसरपंच सुभाष खानोलकर यांच्या नेतृत्वाखाली खानोली ग्रामस्थांनी सा.बा.उपअभियंता भगत यांना निवेदन देऊन येत्या आठ दिवसात काम सुरु करावे अशी मागणी केली, अन्यथा सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांची भेट घेऊन सदर रस्त्याच्या कामाबाबत तक्रार करणार असल्याचे सांगितले. यावेळी उपअभियंता भगत यांनी लगेचच ठेकेदाराला नोटीस काढून आठ दिवसात काम सुरु होईल असे आश्वासन शिष्टमंडळाला दिले. यावेळी खानोली ग्रामस्थांसोबत भाजपा जिल्हा सरचिटणीस प्रसंन्ना देसाई, जिल्हा का.का.सदस्य रामकृष्ण उर्फ बाळा सावंत, सोशल मिडीयाचे विष्णु उर्फ पप्पु परब, दिंव्यांग आघाडीचे सुनील घाग, मनोहर खानोलकर, सुनील सावंत, पांडुरंग सावंत तसेच खानोली ग्रामस्थ उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!