स्वराज प्रबोधिनी खानापूर पुरस्कृत उपक्रम
सांगली (प्रतिनिधी) : स्वराज प्रबोधिनी खानापूर पुरस्कृत विद्यार्थी साहित्य महोत्सव २०२६ च्या बोधचिन्हाचे अनावरण सांगली येथे मराठी साहित्य परिषदेचे अध्यक्ष, अभिनेते, नाटककार व दिग्दर्शक योगेश सोमण यांच्या हस्ते राजमती कन्या महाविद्यालय सांगली येथे संपन्न झाले. यावेळी विद्यार्थी महोत्सवाचे संकल्पक प्रा. रामराजे माने, मसाप चे सांगली जिल्हा प्रतिनिधी डॉ. दीपक स्वामी, मसाप सांगलीचे अध्यक्ष प्रा. डॉ. संजय ठिगळे आणि पदाधिकारी, साहित्यिक वैजनाथ महाजन, आनंदहरी. यावेळी सांगली, मिरज, आटपाडी, खानापूर, ईश्वरपूर, शिराळा, पलूस आदी ठिकाणाहून आलेले साहित्यिक व साहित्य प्रेमी उपस्थित होते.












