दाणोलीतील युवकाचा प्रामाणिकपणा; सावंतवाडी पोलिसांकडून सन्मान…
सावंतवाडी (प्रतिनिधी) : रस्त्यात मिळालेले पाकीट पोलिसांकडे देऊन प्रामाणिकपणा दाखवणाऱ्या दाणोली येथील युवकाचा सावंतवाडी पोलिसांकडून सन्मान करण्यात आला आहे. संबंधित पाकीट हे तेलंगणा येथील एका ट्रक चालकाचे होते ते आपल्या ट्रकमधून गोवा ते तेलंगणा प्रवास करत असताना दाणोली येथे त्यांचे पाकीट रस्त्यावर पडले होते.
हे पाकीट स्थानिक तरुण वसंत बिले यांना सापडले होते त्यांनी आपल्या मित्रांच्या सहकार्याने हे पाकीट आज सावंतवाडी पोलिसांकडे सुपूर्द केले होते यासाठी तेजज स्वार आणि दीप्तेश सुकी या दोन सहकारी मित्रांनी पुढाकार घेतला संबंधित मालकाची चौकशी केली यावेळी आपण तेलंगणा येथे असल्यामुळे आपल्याला ते पाकीट कुरियर करा अशी त्यांनी मागणी केली त्यानुसार हे पाकीट संबंधित मालकाला कुरिअर करण्यात आले त्यात 4हजार दोनशे रक्कम आणी मुख्य कागदपत्रे होती त्यामुळे संबंधित मालकांनै त्यांचे आभार मानले तर असा प्रामाणिकपणा दाखवल्यामुळे पोलिसांनी सुध्दा या युवकांना पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला.











