खारेपाटण तालुका निर्मितीसाठी पर्यावरण पुरक १००० कापडी पिशवी वाटून जनजागृती करण्यात येणार

खारेपाटण (प्रतिनिधी) : खारेपाटण तालुका निर्मिती कृती समितीच्या वतीने रविवार दि.२७ सप्टेंबर २०२६ रोजी खारेपाटण हायस्कूल येथे होणाऱ्या खारेपाटण तालुका झालाच पाहिजे मागणीसाठी घेण्यात येणाऱ्या महा निर्धार मेळाव्याच्या माध्यमातून खारेपाटण ग्रामपंचायतीच्या वतीने पर्यावरण पुरक कापडी पिशव्यांचे वितरण नागरिकांसाठी करण्यात येणार आहे.

या पर्यावरण पुरक कापडी पिशव्यांचा शुभारंभ जिल्हा परिषद सदस्य प्राची ईसवलकर यांच्या शुभहस्ते खारेपाटण ग्रामपंचायत कार्यालय येथे सरपंच महेंद्र गुरव यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला. यावेळी खारेपाटण तालुका निर्मिती कृती समितीचे अध्यक्ष रमाकांत राऊत, सचिव – संतोष पाटणकर, ग्रामपंचायत सदस्य किरण कर्ले, व ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते.

error: Content is protected !!