खारेपाटण येथे श्री देव नृसिंह मंदिर जिर्णोद्वार सोहळ्यास प्रारंभ

खारेपाटण (प्रतिनिधी) : कणकवली तालुक्यातील खारेपाटण गावात मुंबई – गोवा महामार्गावर श्री देव नृसिंह प्रतिष्ठान हसोळटेंब कोंडवाडी खारेपाटण यांच्या वतीने स्वनिधितून व श्रमदानातून तसेच वस्तुरुपी व आर्थिक देणगीतून याबरोबरच ग्रमस्थांच्या सहकार्यातून साकारलेल्या श्री देव नृसिंह मंदिराचा जीर्णोद्धार सोहळा, मंगलाचरण, वास्तुशांती,कलशारोहण सोहळा व मूर्ती प्रतिष्ठापन सोहळा आदी कार्यक्रमाला सोमवार दि.२२ मे २०२३ पासून सुरवात झाली असून सलग तीन दिवस हा कार्यक्रम चालणार असल्याचे श्री देव नृसिंह प्रतिष्ठान खारेपाटण चे सचिव श्रीकांत राऊत यांनी प्रसिद्ध पत्रकाद्वारे माहिती दिली.

सोमवारी २२ मे रोजी श्री देव नृसिंह मंदिराच्या शिखर कळसाची मिरवणूक काळभैरव मंदिर ते श्री देव केदारेश्वर /रवळनाथ मंदिर ते श्री देव नृसिंह मंदिर अशी ढोल तशांच्या गजरात व फटाक्यांच्या आतशबाजीत खारेपाटण गावात मिरवणूक काढण्यात आली.तर मंगळवार दि.२३ रोजी सकाळी ७.०० वाजल्या पासून मंगलाचरण, पुण्यहवाचन, जलधिवास,देवता स्थापन, वास्तू होम,कळस शुद्धी व कलशारोहण आदी धार्मीक विधिवत कार्यक्रम श्री देव नृसिंह मंदिरात घेण्यात आले.

तसेच बुधवार दि.२४ मे रोजी सकाळी ७.०० वा.शंतीसुक्तपठण, स्थापित देवता पूजन,मुख्य देवता हवन,तत्व होम,मूर्ती प्रतिष्ठापना व पूजन बलिदान पूर्णाहुती,अभिषेक, आशीर्वाद व श्री सत्यनारायण पूजा, आरती,मंत्र,पुष्प व दुपारी १ ते ३ वा. महाप्रसाद, सायं.४.०० ते ६.०० वा.महिलांचे हळदी कुंकू समारंभ तर रात्री ९.०० वा.नवतरुण दशवतार नाट्य मंडळ यांचे महा पौराणिक मालवणी दशवतार नाटक “अघोरी प्रलय” नाट्यप्रयोग सादर होणार आहे. तरी या कार्यक्रमाला ग्रामस्थानी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन खारेपाटण गावचे माजी सरपंच व श्री देव नृसिंह प्रतिष्ठानचे कार्यकर्ते रमाकांत राऊत यांनी केले आहे.

error: Content is protected !!