तळेरे (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघ देशपातळीवरील सर्व व्यापारी संघटनां सोबत येत्या २ ॲाक्टोबर रोजी एक दिवस नो युपीआय डे म्हणून घोषीत करीत आहे. येत्या २ ॲाक्टोबर रोजी संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तमाम व्यापाऱ्यांनी सर्व प्रकारचे व्यवहार फक्त रोखीनेच करावेत. या दिवशी कोणीही ग्राहकांकडून ॲानलाईन (युपिआय) द्वारे पैसे स्विकारण्यास नम्रपणे ठाम नकार देवून पैशाच्या ऑनलाईन देवघेवीवर ०.४% M.D.R लागू करण्याच्या प्रस्तावीत निर्णया बद्दलच्या व्यापारी बांधवांच्या तिव्र भावना केंद्र शासनाच्या निदर्शनास आणून द्यावा यासाठी हा निर्णय घेण्यात आलेला असे आवाहन सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघाच्या वतीने करण्यात आला आहे. आमचा युपिआय/ एम.डि.आर ला विरोध नाही. फक्त M.D.R चा आर्थिक भुर्दंड व्यापाऱ्यांवर पडू नये एवढीच मागणी आहे. अशा प्रकारची मागणी जिल्हा व्यापारी महासंघाचे अध्यक्ष संजय सावंत व कार्यवाह चंद्रकांत ऊर्फ राजू जठार केली आहे.
२ ॲाक्टोबर रोजी सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघाचा नो UPI डे पाळण्याचा निर्णय









