चेअरमन गणपत वळंजू व सी.ई.ओ ईश्वरदास पावसकर यांची माहीती
कणकवली (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्हा वैश्य समाज सहकारी पतसंस्था मर्यादीत फोडाघाट वा संस्थेची ३५ वी वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार दिनांक २७/०९/२०१६ रोजी राधाकृष्ण मंगल कार्यालय फोंडाघाट येथे संपन झाली. लाभांग वाटपातील सातत्य कायम ठेवत या वर्षीही संस्थेने सभासदांकरिता १३ टक्के लाभांप जाहीर करत संस्थेच्या सभासदांच्या तसेच असंख्य ग्राहकांच्या सहकार्यामुळे संस्था प्रगतीचा आलेख चढ़ता ठेवण्यात यशस्वी झाली असल्याचे सिध्द केले असून या बद्दल सर्व सभासदांचे, ग्राहकांचे व हितचिंतकांचे संस्थेचे मा. अध्यक्ष गणपत वि. वळंजू तसेच मुख्यकार्यकारी अधिकारी ईश्वरदास शा. पावसकर यांनी मनःपूर्वक आभार मानले आहेत.
संस्थेस सन २०२५-२६ या आर्थिक वर्षामध्ये निव्वळ नफा रू. ३ कोटी ०५ लाख मात्र इतका झाला आहे. पतसंस्थेच्या निव्वळ नफ्यामध्ये झालेली बाढ हि पतसंस्थेच्या प्रगतीचा आलेख उंचविणारी आहे. संस्थेच्या प्रगतीचा आढावा घेतला असता सभासदांनी संस्थेवर दाखविलेल्या विश्वासाच्या जोरावर संस्थेने आपली घोडदौड चालू ठेवली असून त्याची आकडेवारी पुढील प्रमाणे आहे. सन २०२५-२६ वा आर्थिक वर्षा अखेर संस्थेचे भाग भांडवल रु. ३ कोटी ८६ लाख, ठेवी रू. १९१ कोटी ०७ लाख, कर्ज रू. १५४ कोटी ६० लाख, निधी रू. १४ कोटी ६० लाख, गुंतवणूक रू. ५७ कोटी ५९ लाख इतकी झाली आहे. तसेच संस्थेचे खेळते भांडवल रू. २१८ कोटी ४६ लाखाचे झाले असल्याची माहीती संस्थेचे चेअरमन गणपत वि. बळंजू व मुख्यकार्यकारी अधिकारी ईश्वरदास शा. पावसकर यांनी दिली.
सध्याच्या डिजिटल युगात वैश्य समाज पतसंस्था देखील मागे नसल्याचे दिसून येते. संस्थेचा आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर हा एक संस्थेच्या शिरपेचातील मानाचा तुरा आहे. तंत्रज्ञानाची कास धरत संस्था कोअर बँकिंग सिस्टीम मध्ये काम करत आहे. संस्थेने मोबाईल अॅप, एन.ई.एफ.टी, आर.टी.जी.एस. आय.एम.पी.एस, नेट बँकिंग, क्युआर, एस.एम.स अर्लट, ईन्च, डोअर बँकिंग तसेच पासबुक प्रिंटींग या सारख्या सुविधा ग्राहकांसाठी उपलब्ध करून दिल्या आहेत. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर कामकाजात करून तत्पर व पारदर्शक सेवा देण्याचा संस्थेचा प्रामाणिक प्रयत्न आहे. संस्था आर्थिक व्यवहार करण्याबरोबरच सामाजिक भानही चांगल्या प्रकारे जपत आहे. वाढती स्पर्धा लक्षात घेता सभासदाभिमूख योजना संस्था सातत्याने राबवित आहे. सभासदांना आधुनिक दर्जेदार सोयी सुविधा मिळाल्या पाहीजेत, आपला सभासद या पासून कुठेही मागे राहता नये याकरिता संस्था युध्द पातळीवर काम करत असून संस्थेच्या या आर्थिक घोडदौडीत संस्थेचे सर्व सभासद, ठेवीतार, ग्राहक, कर्मचारी, अल्पबचत प्रतिनिधी तसेच असंख्य हितचिंतक यांचे * मोलाचे सहकार्य व हातभार असल्याचे संस्थेचे अध्यक्ष गणपत वि. वळंजू आणि मुख्यकार्यकारी अधिकारी ईश्वरदास शा. पावसकर यांनी सांगितले.
या आर्थिक वर्षात संस्थेने खऱ्या अर्थाने जिल्हयाबाहेर आपला कार्यविस्तार वाढविला असून रत्नागिरी जिल्हयामध्ये राजापूर व पाचल त्याचप्रमाणे कोल्हापूर जिल्हयात राधानगरी व आजरा या ठिकाणी नवीन शाखा सुरू केल्या असून सिंधुदुर्ग जिल्हयामध्ये आचरा या ठिकाणीही शाखा कार्यालय सुरू करत संस्थेच्या आज शाखा विस्तार १८ शाखा पर्यंत झाला आहे. मार्च २०२७ पर्यंत रू. २५० कोटी ठेवींचे लक्ष गाठण्याचा संकल्प करण्यात आला असून लवकरात लवकर ठेवीचे उद्दीष्ठ गाठण्याकरिता सर्व सभासदांनी हातभार लावण्याचे आव्हान याअनुषंगाने करण्यात आले. यावेळी सभासदांनी संस्थेच्या प्रगती बावत समाधान व्यक्त करत संस्थेच्या विकासाच्या दृष्टीने अनेक महत्वपूर्ण सूचना करून संचालक मंडळ तसेच कर्मचारी, अल्पवचत प्रतिनिधींचे अभिनंदन केले. सुनिल कोरगांवकर यांच्या हकालपट्टीचा विषय त्यांनी आपल्याकडून गैर समजातून काही गोष्टी घडल्याचे मान्य करून आपली संस्थेबाबत कुठल्याही प्रकारची तक्रार नसल्याचे मान्य केल्याने स्थगित करण्यात आला. यासभेसाठी मोठ्या संख्येने सभासदांनी उपस्थिती दर्शविली होती. सदर सभा खेळीमेळीच्या वातावरणात पार पाडल्याबाबत सर्व सभासदांचे आभार संचालक दिलीप पारकर यांनी मानून सभेचे कामकाज पूर्ण करण्यात आले. यावेळी अध्यक्ष गणपत वि. वळंजू, संचालक सुनिल दि. कोरगांवकर, संचालक दिलीप रा. पारकर, गणपत शं. पारकर, संजय धा. पेडणेकर, सुनिल श. डुबळे, ऍड. समिर प्र. वंजारी, उमेश स. वाळके, अनिता अ. रेवडेकर, रश्मी रा. माणगांवकर आणि मुख्यकार्यकारी अधिकारी ईश्वरदास शा. पावसकर उपस्थित होते.









