खारेपाटण (प्रतिनिधी) : मागील काही दिवसापासून सातत्याने फेसबुक, व्हाट्सअप,इस्ट्राग्राम आदी हातात उपलब्ध असलेल्या सोशल मीडियाचा अतिरेकी वापर करून तसेच माहितीच्या अधिकाराचा गैर वापर करून सर्व सामान्य नागरिक ते सरकारी कर्मचारी व लोकप्रतिनिधींवर नाहक खोटे नाटे बदनामकरक आरोप करणारा व मुळगाव चिंचवली ता.कणकवली जि.सिंधुदुर्ग येथील रहिवासी असलेला तसेच सध्या मुंबई येथे वास्तव्यास असणारा प्रदीप गोविंद भालेकर याच्या विरोधात खारेपाटण मतदार संघातील सिंधुदुर्ग जिल्हा परिषद सदस्या सौ प्राची ईसवलकर यांनी लेखी तक्रार अर्ज दाखल केला असून भालेकर यांच्यावर कणकवली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती जि.प.सदस्य प्राची ईसवलकर यांनी प्रसिदिप्तेकद्वारे दिली.
याबाबत अधिक वृत्त असे की,प्रदीप भालेकर हे गेल्या अनेक दिवसापासून खारेपाटण तसेच आजुबाजूच्या नागरिकांना लोक प्रतिनिधींना व कर्मचारी वर्ग यांच्या बाबत सोशल मीडियाचा वापर करीत आपल्या स्वतःच्या फेसबुक अकाऊंटवरून आक्षेपहार्य मजकूर प्रसिद्ध करून बदनामी करण्याचा प्रयत्न करत असून खारेपाटण गावच्या माजी सरपंच व विद्यमान जि.प.सदस्य प्राची ईसवलकर यांच्याबाबत देखील भालेकर यांनी सामाजिक कार्यप्रणालीला व व्यक्तिगत कार्याला हानी पोहचविणारे आक्षेपहार्य मजकूर प्रसिद्ध करून व समाजामध्ये चुकीची माहिती पसरवून नाहक बदनामी केली आहे.त्यामुळे समाजामध्ये लोकप्रतिनिधींना मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत असल्याची प्रतिक्रिया जि.प. सदस्य प्राची ईसवलकर यांनी प्रसिद्धपत्रकद्वारे दिली आहे.
माझ्या खारेपाटण सरपंच पदाच्या काळात मी कोणतेही चुकीचे काम केलेले नसून सोशल मीडियावर माझे जाहीर फोटो प्रसिद्ध करून माझे चारित्र्य हनन करणारा मजकूर प्रसिद्ध करून भालेकर यांनी माझी जाहीर बदनामी केली असल्याचे देखील सौ ईसवलकर यांनी निवेदनात म्हटले आहे.या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून मी माझे वकील अनिल केसरकर यांच्या मार्फत भालेकर यांना याबाबत कायदेशीर नोटीस पाठवली असून या संदर्भात योग्य ते पुरावे सादर न केल्यास आपण श्री भालेकर यांच्यावर अब्रुनुकसानीचा व मानहानीचा दावा देखील दाखल करणार असल्याचे जि.प.सदस्य सौ प्राची ईसवलकर यांनी लेखी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
तसेच या संपूर्ण प्रकरणात मुख्य सूत्रधार हा खारेपाटण गावातीलच व्यक्ती असून लवकरच त्याचे पितळ जनतेसमोर उघडे पडणार आहे. राजकीय नपुंसक असलेल्या व ज्यांना जनतेने केंव्हाच नाकारलेले आहे.व ज्यांची राजकीय कारकिर्द संपुष्टात आलेली आहे.असे हे शंड माहितीच्या आधाराचा गैर वापर करून व दबाव आणून आपली स्वतःची अनअधिकृत कामे करू पाहणारा असा व्यक्ती गावासाठी घातक आहे.अशा व्यक्तींना योग्य वेळी योग्य समज देऊन रीतसर समाचार घेतला जाईल असे देखील जि.प.सदस्य ईसवलकर यांनी म्हटले आहे.
यांच्यात थोडा जरी पुरुषार्थ असेल तर त्यानी समोरा समोर चर्चेला येऊन बसावे.मात्र असे व्यक्ती समोर येणार नाहीत. कारण ते स्वतःच भ्रष्टाचाराने बरबटलेले आहेत.म्हणून जनतेने त्यांना त्यांची लायकी दाखवून दिली आहे.माझ्या विभागातील जनता सुज्ञ आहे.त्यांच्या पाठिंब्यानेच माझी राजकीय कारकिर्द सुरू झालेली आहे.व जनतेच्या प्रेमाचे सामर्थ्य माझ्याकडे आहे.त्यामुळे अशा दोन चार टाळक्यांना मी कवडीचीही किंमत देत नाही असे देखील खारेपाटण जिल्हा परिषद मतदार संघाच्या जि.प.सदस्या सौ प्राची ईसवलकर यांनी शेवटी प्रसिद्धीसाठी दिलेल्या लेखी निवेदनात म्हटले आहे.












