कै. बा. ना. बिडये विद्यालयात आचरा येथे शनिवारी शारदोत्सवाचे आयोजन!

सरस्वती पूजन, बालकलाकारांचे भजन, सांस्कृतिक कार्यक्रमांसह विविध उपक्रमांची मेजवानी

आचरा (प्रतिनिधी) : आचरा येथील कै. बा. ना. बिडये विद्यालय केंद्रशाळा नं १ येथे शनिवार, दि. १७ ऑक्टोबर २०२६ रोजी शारदोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या उत्सवाच्या निमित्ताने सरस्वती पूजन, पाटीपूजन, आरती, तीर्थप्रसाद, बालकलाकारांचे भजन, सांस्कृतिक कार्यक्रम आणि स्थानिक भजनांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

शारदोत्सवाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांमध्ये शैक्षणिक व सांस्कृतिक मूल्यांची रुजवण व्हावी, तसेच कला आणि भक्तीचा संगम अनुभवता यावा, हा या उपक्रमामागील उद्देश आहे. या निमित्त सकाळी ९ वाजता सरस्वती पूजन व पाटीपूजन, सकाळी १० वाजता आरती व तीर्थप्रसाद, सकाळी ११ ते दुपारी १२ वाजेपर्यंत बालकलाकारांचे भजन, दुपारी १२ ते २.३० वाजेपर्यंत अल्पोपहार, दुपारी २.३० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत सांस्कृतिक कार्यक्रम, सायंकाळी ७ ते रात्री १० वाजेपर्यंत स्थानिक भजने असा कार्यक्रम असे होणार आहे, या शारदोत्सवाचे आयोजन मुख्याध्यापक व सहकारी शिक्षकवृंद, शाळा व्यवस्थापन समिती, अंगणवाडी सेविका, समस्त पालकवर्ग आणि ग्रामस्थ यांच्या सहभागातून करण्यात आले आहे. या भक्तिमय व सांस्कृतिक सोहळ्याचा लाभ सर्वांनी घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

error: Content is protected !!