बांदा (मंगल कामत) : मंगेश रघुनाथ कामत चेरी्टेबल ट्रस्ट, मुंबई संचलित व्ही. एन. नाबर मेमोरियल इंग्लिश मिडीयम स्कूल, मडुरा येथील स्कूल कमिटी सदस्य प्रकाश वालावलकर यांना मंथन सोशल फाउंडेशन, पंढरपूर यांच्यातर्फे राष्ट्रीय आदर्श कृषीभूषण पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल शाळेच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.
संस्थेचे चेअरमन मंगेश रघुनाथ कामत यांच्या हस्ते प्रकाश वालावलकर यांना शाल व श्रीफळ देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी लोकल कमिटीचे चेअरमन भिकाजी धुरी यांनी अभिनंदनपर भाषणातून वालावलकर यांच्या यशाचे कौतुक करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमाला शाळा समिती सदस्य सुरेश गावडे, भिकाजी धुरी, जितेंद्र नाईक, पालक-शिक्षक संघाच्या उपाध्यक्षा श्रावणी परब, मुख्याध्यापिका नीती साळगावकर, सहशिक्षिका मयुरी कासार व हर्षदा तळवणेकर उपस्थित होत्या.
उपस्थित सर्वांनी प्रकाश वालावलकर यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.












