पालकमंत्री नितेश राणे आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या आवाहनाला प्रतिसाद
वैभववाडी (प्रतिनिधी) : पालकमंत्री ना. नितेश राणे आणि जिल्हाधिकारी यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत वैभववाडी तालुका व्यापारी संघटनेने बंधारे बांधण्यासाठी पुढाकार घेतला आहे. या उपक्रमांतर्गत व्यापारी संघटनेच्या वतीने २९०० पिशव्या पंचायत समिती वैभववाडी कार्यालयाकडे सुपूर्द करण्यात आल्या.
बंधारे बांधण्यासाठी आवश्यक साहित्य उपलब्ध व्हावे आणि जलसंधारणाच्या कामांना हातभार लागावा, या उद्देशाने व्यापारी संघटनेने ही मदत केली. पालकमंत्री आणि जिल्हाधिकारी यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत व्यापारी संघटनेने सामाजिक बांधिलकी जपत सहकार्याचा हात पुढे केला आहे.
यावेळी जिल्हा व्यापारी महासंघाचे अध्यक्ष संजय सावंत, व्यापारी मंडळाचे तालुकाध्यक्ष तेजस आंबेकर, मनोज सावंत, संतोष कुडाळकर, लवू पारकर, रवी सांगावेकर, वसंत पटेल, रवींद्र पाटील आदी उपस्थित होते.
व्यापारी संघटनेच्या या सहकार्यामुळे बंधारे बांधण्याच्या उपक्रमाला मदत होणार असून, जलसंधारणाच्या कामांसाठी विविध घटकांनी पुढाकार घेण्याचे महत्त्व अधोरेखित झाले आहे.












