कणकवली (प्रतिनिधी) : चिपळूण निवळी (कोष्टेवाडी) येथील माजी शिक्षक तथा प्रतिष्ठित उद्योजक विजय शंकर पाकळे यांचे गुरुवार, १५ ऑक्टोबर रोजी सायंकाळी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या निधनाने निवळी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
विजय पाकळे हे कणकवली येथील गेटवेल हॉस्पिटलचे डॉ. निलेश पाकळे यांचे वडील होत. त्यांनी शिक्षक म्हणून सेवा बजावली होती. तसेच उद्योजक म्हणूनही त्यांनी आपली ओळख निर्माण केली होती.
त्यांच्यावर आज, शुक्रवार, १६ ऑक्टोबर रोजी सकाळी ९ वाजता निवळी-कोष्टेवाडी येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, सुना नातवंडे असा परिवार आहे.












