कणकवली (प्रतिनिधी) : अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी शिरवल, ता-कणकवली येथील मयूर सखाराम कासले याची ओरोस येथील विशेष जिल्हा न्यायालयाने सशर्त जामिनावर मुक्तता केली. संशयित आरोपीचे वतीने अँड.प्राजक्ता शिंदे यांनी काम पाहिले. दिनांक ३०/०४/२०२३ रोजी पिडीतेचे अपहरण झालेबाबत कणकवली पोलीस स्टेशन येथे पिडीतेचे वडिलांनी तक्रार दाखल केली होती. सदर तक्रारीवरून संशयित आरोपी याचेविरुद्ध भा.द.वि.कलम ३६३ अन्वये गुन्हा नोंद झाला होता. व पिडीतेवर जबरदस्तीने अत्याचार झाले असलेबाबत तक्रारीवरून कणकवली पोलिसांनी संशयित आरोपी याचेविरुद्ध भा.द.वि.कलम ३७६,३७६(२)(j), सह बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण अधिनियमचे कलम ४, ८ , १२ अन्वये गुन्हा नोंद होऊन संशयित आरोपी यास दिनांक १/०५/२०२३ रोजी अटक करण्यात आली होती. संशयित आरोपीच्या वतीने विशेष जिल्हा व सत्र न्यायाधीश यांचे कोर्टात जामिनासाठी अर्ज दाखल करण्यात आला होता. सदर अर्जावर सुनावणी झाली. आरोपीच्या वतीने अँड.प्राजक्ता शिंदे यांनी यशस्वी युक्तिवाद केला. आज दिनांक २५/०५/२०२३ रोजी ओरोस येथील विशेष जिल्हा व सत्र न्यायाधीश यांनी संशयित आरोपी याची सशर्त जामिनावर मुक्तता केली.