रोटरी क्लब ऑफ खारेपाटण च्या वतीने प्रिंदावन हायस्कूल १० वी च्या विद्यार्थ्यांना स्टडी अँप चे वितरण

खारेपाटण (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रोटरी क्लब ऑफ खारेपाटण या सामाजिक संस्थेच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीच्या दृष्टीने राजापूर तालुक्यातील सेनापती बापू गोखले विद्या मंदिर प्रिंदावन येथील हायस्कूल मधील इयत्ता १० वी च्या सर्व शालेय विद्यार्थ्यांना शुक्रवार दि.२३ रोजी स्टडी अँप चे वितरण मान्यवरांच्या शुभ हस्ते करण्यात आले.

या कार्यक्रमाला रोटरी क्लब ऑफ खारेपाटण चे माजी अध्यक्ष रोट्रियन दयानंद कोकाटे, सचिव – सुबोध देसाई, खजिनदार – शर्मिन काझी, खारेपाटण हायस्कूलचे मुख्याध्यापक व रोट्रियन संजय सानप, रोट्रियन संतोष पाटणकर, अजय गुरसाळे, महिंद्रे मॅडम, अमृते मॅडम आदी मान्यवर उपस्थित होते.

याप्रसंगी प्रिंदावन हायस्कूल चे मुख्याध्यापक श्री एस के भोगन यांनी रोटरी क्लब ऑफ खारेपाटण च्या सर्व सदस्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.यावेळी प्रशालेचे शिक्षक ओ व्हि तिर्लोटकर,एस ए शेळके,एम बी तेरदाळे, के. के. कदम उपस्थित होते.खारेपाटण हायस्कूलचे मुख्याध्यापक संजय सानप यांनी विद्यार्थ्यांना स्टडी अँप विषयी माहिती देऊन मार्गदर्शन केले.

यावेळी रोटरी क्लब ऑफ खारेपाटण च्या वतीने प्रिंदावन हायस्कूलच्या इयत्ता १० वीच्या सुमारे २२ शालेय विद्यार्थ्यांना स्टडी अँप चे वितरण करण्यात आले. या शैशणिक अशा सामाजिक उपक्रमा बद्दल प्रिंदावन हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री भोगन यांनी रोटरी क्लब ऑफ खारेपाटण चे आभार व्यक्त केले.

error: Content is protected !!