कणकवली (प्रतिनिधी) : शिंपी समाज ऐक्यवर्धक संघ, कणकवलीच्या अध्यक्षपदी अभिजीत मिरजकर यांची निवड करण्यात आली.संघाची बैठक रविवार २२ नोव्हेंबरला कणकवलीत पार पडली. यात संघाच्या नूतन कार्यकारी मंडळाची निवड करण्यात आली. उपाध्यक्षपदी राजेंद्र वर्णे, कार्यवाहपदी ऋतुजा कोरडे, सहकार्यवाहपदी गुरुदत्त शंकरदास, तर खजिनदारपदी किशोर शंकरदास, सदस्यपदी अजित काकडे, माधवी काकडे, ऋषिकेश कोरडे, विनिता वरुणकर, यशवंत महाडिक, सिद्धेश खटावकर, पूजा शंकरदास, देवेंद्र माळवदे यांचा समावेश आहे. अध्यक्ष सुहास वरुणकर यांच्या आकस्मिक निधनामुळे विद्यमान कार्यकारी मंडळ बरखास्त करण्यात आले होते. त्यानुसार नूतन कार्यकारी मंडळाची निवड करण्यात आली. शिंपी समाजाचे संघटन अधिक मजबूत करणे, समाजातील ऐक्य वाढविणे आणि समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी विविध उपक्रम राबविणे यासाठी प्रयत्न करणार असल्याचे नवनिर्वाचित अध्यक्ष अभिजीत मिरजकर यांनी सांगितले.
शिंपी समाज ऐक्यवर्धक संघाच्या अध्यक्षपदी अभिजीत मिरजकर












