पंचायत समिती देवगडमध्ये संविधान दिन उत्साहात साजरा

देवगड (प्रतिनिधी) : पंचायत समिती देवगड येथे भारतीय संविधान दिन उत्साहात साजरा करण्यात आला. गटविकास अधिकारी निलेश जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली संविधान दिनानिमित्त उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी संविधानाच्या मूल्यांचे पालन करण्याची शपथ घेतली. यावेळी भारतीय संविधानाचे महत्त्व, संविधानाने नागरिकांना दिलेले हक्क व कर्तव्ये तसेच लोकशाही व्यवस्थेतील संविधानाचे स्थान याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. संविधानातील स्वातंत्र्य, समता, बंधुता व न्याय या मूल्यांचा अंगीकार करून लोकशाही अधिक सक्षम करण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला. कार्यक्रमास पंचायत समिती देवगडचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

error: Content is protected !!