खारेपाटण (प्रतिनिधी): मुळगाव शेजवली, ता.राजापूर जि.रत्नागिरी येथील रहिवासी असलेले व सद्या खारेपाटण शिवाजीपेठ येथे सुवर्णकार म्हणून व्यवसाय करणारे तरुण व्यापारी प्रमोद प्रकाश कुबल वय -४२ वर्षे यांचे आज सोमवार दि.२९/५/२०२३ रोजी सकाळी ७.३० वाजता त्यांच्या मूळ गावी शेजवली येथे हृदय विकाराच्या तीव्र झटक्याने दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाची बातमी खारेपाटण दशक्रोशित समजताच सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. खारेपाटण बाजारपेठ येथे कै. प्रमोद कुबल यांचे सोन्याचे दागिने बनविण्याचे दुकान होते.तसेच खारेपाटण व्यापारी असोसिएशनचे ते सभासद होते. चेहऱ्यावर नेहमी स्मित हास्य असणारे कै. प्रमोद कुबल त्यांच्या निधनाची बातमी सर्वत्र समजताच खारेपाटण बाजारपेठ दुपारनंतर पूर्ण बंद ठेवून व्यापारी बांधवांच्या वतीने त्यांना श्रद्धाजली अर्पण करण्यात आली. कै.प्रमोद कुबल यांच्या पश्चात पत्नी,मुलगा व आई वडील असा परिवार आहे.
खारेपाटण मधील सुवर्णकार प्रमोद प्रकाश कुबल यांचे दुःखद निधन….










