आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्युज चॅनलने प्रसारीत केले होते विस्कळित सेवेचे वृत्त
वैभववाडी (प्रतिनिधी) : वैभववाडी तालुक्यात गेल्या दोन दिवसांपासून जिओ मोबाईल ची सेवा विस्कळित झाली होती. जिओ च्या नेटवर्क च्या समस्येमुळे हॅलो.. हॅलो.. म्हणता म्हणता ग्राहकांचा जीव कासावीस झाला होता. वाढलेल्या रिचार्ज दरात पुन्हा दोन- तिनं दिवस नेटवर्क समस्या म्हणजे दूष्काळात तेरावा महिना यामुळे ग्राहकांना आर्थिक भुर्दंड देखील सोसावा लागत आहे. यामुळे ग्राहकांकडून प्रचंड रोष व्यक्त केला जात आहे. सदर वृत आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्युज चॅनलच्या माध्यमातून आज सकाळी प्रसारीत करण्यात आले होते. त्यानंतर काही तासांतच जीओ मोबाईल नेटवर्क मध्ये सुधारणा झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे गेले दोन दिवस नेटवर्क समस्येमुळे त्रस्त असलेल्या ग्राहकांमधील नाराजीचा सूर कमी होताना पहायला मिळत आहे.











