वैभववाडीत महावितरण विभाग तहसीलदार व भुमीअभिलेख कार्यालयाच्या मध्ये उडवणार ठिणगी

सरकारी कार्यालयांच्या शेजारील विद्युत वाहिन्या जमिनीस टेकण्याच्या मार्गावर

वैभववाडी (प्रतिनिधी) : वैभववाडी तालुक्यातील तहसीलदार कार्यालय व भुमीअभिलेख कार्यालयाच्या मधुन जाणाऱ्या विद्युत वाहिन्या जमीनीस टेकण्याच्या मार्गावर आहेत त्या तात्काळ ओढल्या न गेल्यास येत्या काही दिवसात वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली तर तहसीलदार कार्यालय व भुमीअभिलेख कार्यालयाच्या मध्ये ठिणगी पडल्याशिवाय राहणार नाही. सदर ठिकाणी नागरिकांचा वावर असल्या कारणाने तात्काळ विद्युत वाहिन्या ओढून घेणे गरजेचे आहे. शिवाय पावळ्यापुर्वी विद्युत वाहिन्या, पोल यांवरील वाढलेल्या वेली, झाडांच्या फांद्या काढून विद्युत वाहिन्या मोकळ्या करणे गरजेचे आहे. महावितरण विभागाने तत्परतेने याबाबत ठोस उपाययोजना करावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

            
error: Content is protected !!