जिल्हा चिरेखाण संघटनेने केले स्वागत
मालवण (प्रतिनिधी): सिंधुदुर्ग जिल्हा खनिकर्म अधिकारी अजित पाटील यांची नुकतीच कोल्हापूर येथे बदली होऊन त्यांच्या जागी नवीन जिल्हा खनिकर्म अधिकारी म्हणून विभोसावे यांची नियुक्ती झाली आहे शुक्रवारी ते ओरोस येथे जिल्हा खनिकर्म कार्यालयांमध्ये हजर झाले जिल्हा चिरेखान संघटना अध्यक्ष संतोष गावडे, सहसचिव महादेव मालकर, बाबा कोकरे यांनी सावे यांची भेट घेऊन त्यांचे स्वागत केले. यावेळी चिरेखान संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सावे यांच्याशी चिरेखान व्यावसायिकांच्या समस्यांबाबत चर्चा करून सहकार्य करण्याचे आवाहन केले. व्यावसायिकांना सहकार्य केले जाईल असे यावेळी सावे यांनी सांगितले.












