कणकवलीत पाऊसधारा…

कणकवली (प्रतिनिधी) : मागील काही दिवसांत तब्बल41 अंश सेल्सियस पर्यंत तापमानाचा पारा चढल्यानंतर आज मंगळवारी कणकवली शहरासह तालुक्यातील बहुतांश परिसरात पाऊसधारा कोसळल्या. सायंकाळी सव्वा चार वाजण्याच्या सुमारास वाऱ्यासह पाऊस कोसळल्याने प्रचंड उष्म्यापासून जनतेची थोडीफार तरी सुटका झाली. अचानक पडलेल्या पावसामुळे हवेत गारवा निर्माण झाल्यामुळे सर्वांनीच उष्म्यापासून थोडाफार तरी सुटकारा मिळाल्याची भावना व्यक्त केली.

error: Content is protected !!