कणकवली (प्रतिनिधी) : नांदगाव सरपंच भाई मोरजकर यांचे माजी खासदार निलेश राणे, आमदार नितेश राणे यांनी वाढदिवस अभिष्टचिंतन केले. भाई मोरजकर हे राणेंचे निष्ठावान कार्यकर्ते आहेत. आज प्रहार भवन मध्ये राणे बंधूनी मोरजकर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी भाजपा प्रदेश उपाध्यक्ष अतुल काळसेकर, जिल्हा सरचिटणीस प्रभाकर सावंत, मनोज रावराणे, महिला जिल्हाध्यक्ष संध्या तेरसे, कणकवली तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री, माजी उपसभापती दिलीप तळेकर , असलदे माजी सरपंच पंढरी वायंगणकर आदी उपस्थित होते.











