पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्काराने दीपिका म्हापणकर व रश्मी हेरेकर सन्मानित

काळसे ग्रामपंचायत येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी

चौके (प्रतिनिधी) : काळसे ग्रामपंचायत येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती साजरी करण्यात आली सरपंच विशाखा काळसेकर यांच्या हस्ते अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. ग्रामपंचायत स्तरावर महिला सक्षमीकरण आणि सामाजिक क्षेत्रात दिलेल्या भरीव योगदानाबद्दल महिला व बालविकास विभाग महाराष्ट्र शासन यांच्यामार्फत देण्यात येणारा ग्रामपंचायत स्तरीय पुण्यश्र्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार सौ. दीपिका देवेंद्र म्हापणकर व सौ. रश्मी राजन हेरेकर यांना सरपंच विशाखा काळसेकर यांच्या हस्ते शाल श्रीफळ आणि प्रशस्तीपत्र या स्वरूपात देण्यात आला. यावेळी ग्रामसेवक पी. आर . निकम आणि सदस्य उपस्थित होते.

error: Content is protected !!