पणदूर हायस्कूलचा निकाल 100 टक्के

कुडाळ ( अमोल गोसावी ): वेताळबांबर्डे विभाग शिक्षण प्रसारक मंडळ संचलित शिवाजी इंग्लिश स्कूल पणदूरतिठा या प्रशालेचा इ. १० वी (एस. एस. सी.) मार्च २०२३ चा निकाल १०० % एवढा लागला. या प्रशालेतून १५६ विद्यार्थी परीक्षेला बसले त्यापैकी १५६ उत्तीर्ण होऊन प्रशालेचा निकाल १००% लागला. प्रथम क्रमांक कु. कृष्णकांत राजेश अटकेकर (गुण ४९१) ९८.८० टक्के, व्दितीय क्रमांक कु. पियुषा महेश सावंत (गुण ४८५) ९७.०० टक्के, तृतीय क्रमांक कु. सेजल सतीश सुर्वे (गुण ४७५) ९५.०० टक्के, चौथा क्रमांक जिग्निषा जगन्नाथ सावंत (गुण ४६९) ९४.४० टक्के, पाचवा क्रमांक कु. आर्या संतोष तेरसे (गुण ४६८) ९४.२० टक्के यांनी मिळविला. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्था चेअरमन शशिकांत अणावकर, संस्थाचालक, प्र. मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी मनःपूर्वक अभिनंदन केले.

error: Content is protected !!