फोंडा कुर्ली येथे एक तास राष्ट्रवादी काँग्रेससाठी उपक्रम

वाडी वस्तीवर जाऊन करणार जनजागृती

पदाधिकारी आणि कार्यकर्ते

कणकवली (प्रतिनिधी): एक तास राष्ट्रवादी काँग्रेससाठी या उपक्रमांतर्गत कणकवली तालुक्यातील फोंडा कुर्ली येथे जिल्हा उपाध्यक्ष अनंतराव पिळणकर यांच्या उपस्थितीत पिळणकर यांच्या निवासस्थानी बैठक घेण्यात आली,या बैठकीत विद्यमान सरकारचा मनमानी कारभार, राष्ट्रवादी काँग्रेसची ध्येय धोरणे राष्ट्रीय स्तरावरील खेळाडूंच्या बाबतीत मानहानी करून खेळाडुंचे मऩोबल खच्चीकरण करण्याची भूमिका,भरमसाठ वाढती महागाई,विरोधी पक्षांना नाहक त्रास देऊन बदनामी, महापुरुषांच्या इतिहासाची मोडतोड करणे,असे घृणास्पद प्रकार भाजप सरकारच्या माध्यमातून सतत होत आहेत भारतीय जनता पक्षाच्या हुकुमशाही हिटलर पद्धतीच्या मार्गाने सुरू असलेला सत्ता कारभार याबाबत उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जनतेमध्ये वाडी वस्तीवर जाऊन याची जनजागृती करावी,असे ठरविण्यात आले यावेळी जिल्हा उपाध्यक्ष अनंतराव पिळणकर,प्रकाश मढवी, उत्तर तेली, संतोष सावंत, सखाराम हुंबे, सेनापती सावंत,राजू वाघाटे, शंकर राणे, प्रवीण पार्टी,बाळा मसुरकर, कृष्णा निकम,बाळा मढवी, सुरेश निकम, शांताराम पारखे, कणकवली युवक विधानसभा मतदारसंघ अध्यक्ष देवेंद्र पिळणकर, यांचेसह अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!