निलेश राणे यांच्या वक्तव्या विरोधात राष्ट्रवादी कार्यकर्ते आक्रमक

कुडाळ येथे निलेश राणेंच्या प्रतिकात्मक पुतळ्यास जोडे मारून केला निषेध

राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांचे जोरदार टीकास्त्र

कुडाळ ( अमोल गोसावी ) : “राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर बोलण्याची निलेश राणे यांची पात्रता नाही. निलेश राणे निलेश राणे यांनी स्वतःच्या संस्कृतीला साजेस असच वक्तव्य केल असून त्यांना नैराश्य आलंय “अशी खरमरीत टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांनी केली आहे. दोन दिवसांपूर्वीच भाजप नेते निलेश राणे यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबाबत वक्तव्य करताना शरद पवार हे औरंगजेबाचा पुनर्जन्म असल्याची टीका केली होती. त्या वक्तव्याचा निषेध म्हणून आज सिंधुदुर्ग जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे मुंबई – गोवा महामार्गावर कुडाळ येथे निषेध व्यक्त केला. यावेळी हातावर काळ्या फिती बांधून निलेश राणे यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याला चप्पल मारून, जोडे मारो आंदोलन करून निषेध नोंदविला.
यावेळी जिल्हा उपाध्यक्ष अनंत पिळणकर, राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश संघटक सचिव काका कुडाळकर, महिला जिल्हाध्यक्षा अर्चना घारे- परब, भास्कर परब, बाळ कनयाळकर, प्रफुल्ल सुद्रीक, आत्माराम ओटवणेकर, निलेश गोवेकर, रूपेश जाधव, प्रज्ञा परब, दर्शना देसाई, रवींद्र चव्हाण, डॉ. संजीव लिंगवत, संग्राम सावंत, पुंडलिक दळवी, साबा पाटकर, कृष्णा बिबवणेकर, विजय वालावलकर, रेवती राणे, दिपीका राणे, देवेंद्र टेमकर, देवेंद्र पिळणकर, शिवाजी घोगळे, सूरज खान, नझीर शेख, सावळाराम अणावकर, महेश कदम, जयराम डिगसकर, धर्माजी बागकर, स्वप्नील राऊळ, सुभाष तांडेल, प्रभाकर पवार, यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते. आताच्या राज्य सरकारला आपली सत्ता जाईल, अशी भीती वाटत असल्याने अशी बेताल वक्तव्ये करणारी माणसे नेमली आहेत. अशा वक्तव्यामुळे समाजात जातीय तेढ निर्माण होईल, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला जिल्हाध्यक्षा अर्चना घारे – परब यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!