सावंतवाडी (प्रतिनिधी) : शिक्षक भरतीपूर्वी राज्यातील अवघड क्षेत्रातील प्राथमिक शिक्षकांच्या सोयीनुसार बदली प्रक्रीया राबविली जावून त्यानंतर बदली प्रक्रीया थांबविण्यात येणार असल्याचे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी सांगितले असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे राज्य सरचिटणीस राजन कोरगावकर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे. राज्यातील प्राथमिक शिक्षकांच्या विविध ज्वलंत प्रलंबित प्रश्नांबाबत महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीने मान नाम दिपक केसरकर, शालेय शिक्षण मंत्री महाराष्ट्र राज्य यांची आज सावंतवाडी जि सिंधुदुर्ग येथे भेट घेऊन निवेदन व चर्चा केली.यावेळी राज्यसरचिटणीस राजन कोरगावकर, सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष नारायण नाईक, जिल्हासरचिटणीस सचिन मदने, सावंतवाडी कार्याध्यक्ष गोविंद शेर्लेकर आदी उपस्थित होते.