सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी): यापूर्वी कधीही देशात पहायला व एकायला मिळाला नव्हता एवढा विकास गेल्या ९ वर्षात पंतप्रधान मोदी यांनी केला आहे. हे सांगण्यासाठी विकास तीर्थ उपक्रम अंतर्गत आज मोटार सायकल रॅली काढली आहे. ही सुरुवात आहे. येणारे वर्ष निवडणुकीचे आहे. देशात चारशे खासदार आणि राज्यात दीडशे आमदार आपल्याला आणायचे आहेत. त्यामुळे पक्षाचे प्रचारक बनून काम केले पाहिजे. आता पक्षाला देण्याची वेळ आपल्यावर आली आहे. त्यामुळे प्रत्येक बुथवर भाजप पक्ष ५१ टक्के दिसला पाहिजे, असे आवाहन भाजप राज्य सचिव निलेश राणे यांनी सिंधुदुर्गनगरी येथे बोलताना केले. मोदी @ ९ अंतर्गत सावंतवाडी ते सिंधुदुर्गनगरी येथील ओरोस फाटा येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा अशी भाजपच्या वतीने आज मोटार सायकल रॅली निलेश राणे यांच्या उपस्थितीत काढण्यात आली. यावेळी जिल्हाध्यक्ष राजन तेली, रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघ निवडणूक प्रमुख प्रमोद जठार, जिल्हा सरचिटणीस प्रभाकर सावंत, महिला जिल्हाध्यक्षा संध्या तेरसे, जिल्हा उपाध्यक्ष अशोक सावंत, रणजित देसाई, सरचिटणीस संजू परब, कणकवली विधानसभा निवडणूक प्रमुख मनोज रावराणे, युवा नेते विशाल परब, ओरोस मंडळ अध्यक्ष दादा साईल, दीपक नारकर, संतोष वालावलकर, आनंद शिरवलकर आदी उपस्थित होते. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला निलेश राणे यांनी पुष्पहार अर्पण केल्यानंतर या रॅलीचा समारोप झाला. त्यानंतर येथील पुलाखाली भाषणे करण्यात आली. दरम्यान, रॅलीला मोठा प्रतिसाद लाभला होता.
मोदी @ ९ अंतर्गत सावंतवाडी ते सिंधुदुर्गनगरी येथील ओरोस फाटा येथे भाजपच्या वतीने आज मोटार सायकल रॅली












