ब्युरो न्युज ( मुंबई ) : मनसेच्या नाका तिथे शाखा उपक्रमाचा लवकरच शुभारंभ होणार आहे. यातली पहिली शाखा मुंबईच्या शिवाजी पार्कवर सुरु होणार आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी मुंबईत झालेल्या बैठकीत नाका तिथे शाखा सुरु करण्याचा आदेश दिला होता.. सर्वसामान्यांसोबत थेट संवाद साधण्यासाठी हा उपक्रम राबवण्याची सूचना राज ठाकरेंनी केली होती. त्यानुसार पहिली शाखा शिवाजी पार्कवर तयार करण्यात येतेय.












