21 हजार चा मुद्देमाल जप्त ; वृद्धेवर गुन्हा दाखल
कणकवली (प्रतिनिधी): साकेडी बोरीचीवाडी येथील पडक्या मांगरात आज दुपारी सव्वा बारा वाजता एलसीबी पोलीस उपनिरीक्षक आर बी शेळके यांच्या नेतृत्वाखाली एलसीबी च्या पथकाने छापा करून गावठी हटभट्टीचा अड्डा उध्वस्त केला. गावठी दारुसह 21 हजार 800 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून याप्रकरणी साकेडी बोरीचीवाडी येथील बितोज जुवाव म्हापसेकर या महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्याद पोलीस नाईक आशिष जमादार यांनी दिली असून या कारवाईत एएसआय कोयंडे , हवालदार कृष्णा केसरकर सहभागी झाले होते.












