हवालदार उत्तम वंजारे यांनी केली कारवाई
कणकवली (प्रतिनिधी): गोवा बनावटीची दारू विक्री करताना फोंडाघाट हवेलीनगर भूषण विष्णू कोथमिरे याला फोंडाघाट पोलीस दुरक्षेत्राचे हवालदार उत्तम वंजारे यांनी पकडले. भूषण कोथिमिरे याच्याकडून गोवा बनावटीची 900 रु.ची दारू जप्त करण्यात आली असून भूषण वर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईत कॉन्स्टेबल मुल्ला सहभागी झाले होते.










