मालवण (प्रतिनिधी): विजेच्या समस्यांबाबत चर्चा करण्यासाठी देवबाग ग्रामस्थांनी आगाऊ सूचना देऊनही वीज वितरण चे अधिकारी कार्यालयात उपस्थित न राहिल्याने संतप्त ग्रामस्थांनी अखेर वीज वितरण कार्यालयाला टाळे ठोकले आहे. अधिकारी येईपर्यंत टाळे खोलणार नाही, असा पवित्रा ग्रामस्थांनी घेतला आहे.
विजेच्या खेळखंडोब्यावरून देवबागवासीय आक्रमक ; विजवीतरण कार्यालयाला ठोकले टाळे












