ग्रामसेवक पतसंस्था सिंधुदुर्ग च्या चेअरमन पदी अमित दळवी व्हाईस चेअरमन पदी नितेश तांबे यांची बिनविरोध निवड

सिंधुदुर्ग (प्रतिनिधी): ग्रामसेवक पतसंस्था सिंधुदुर्ग च्या चेअरमनपदी अमित दळवी,व्हाईस चेअरमनपदी नितेश तांबे यांची बिनविरोध निवड झाली आहे. यावेळी महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक संघटना DNE 136 राज्याध्यक्ष संजीवजी निकम,सरचिटणीस सुचितजी घरत,माजी चेअरमन सूर्यकांत वारंग, ग्रामसेवक युनियनचे जिल्हाध्यक्ष संतोषजी गावडे, सरचिटणीस गणेश बागायतकर,जळगाव जिल्हाध्यक्ष पाटील ,कार्याध्यक्ष प्रशांत वर्दंम, उपाध्यक्ष संदीप गवस,सहसचिव मंगेश राणे, कोषाध्यक्ष मनमोहन धुरी पतसंस्था सचिव पावसकर तसेच सर्व जिल्ह्यातील तालुकाध्यक्ष व सचिव आणि बहुसंख्य ग्रामसेवक उपस्थित होते. यावेळी नूतन चेअरमन अमित दळवी,व्हाईस चेअरमन नितेश तांबे,संचालक वैभव सावंत,दत्तात्रय तळवडेकर,सदाशिव अंधारी,महानंदा वराडकर,प्रफुल्ल धुरी, विवेक नर,शमसुद्दीन साठविलकर, युगल प्रभुगावकर,घनश्याम नावले,मीनाक्षी पिलनकर,उमेश खोबरेकर यांचे सत्कार करण्यात आले.यावेळी नूतन संचालकांनी पतसंस्था कामकाज सभासदांना विश्वासात घेत सभासदांच्या हिताला प्राधान्य देत चांगल्या प्रकारे करण्याचा निर्धार केल्याचे सांगितले.

error: Content is protected !!